गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान

बैलाचा होरपळून मृत्यू, गोठ्याची राखरांगोळी

0

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक बैल, ३० क्विंटल सोयाबीन,५० क्विंटल कापूस व गोठ्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वणी शहरातील उषा दिलीप बिलोरिया यांचे गणेशपुर शिवारात शेत आहे.  गुरूवी रात्री अचानक गोठ्याला आग लागली या आगीत गोठ्यात बांधून असलेला बैल आगीत होरपळला. तर गोठ्यात साठवून ठेवलेले ३०क्विंटल सोयाबीन, ५० क्विंटल कापूस जळून खाक झाला असल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या घटनेची माहिती मिळतात बिलोरिया कुटुंब गावातील व शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जुना गोठा पूर्णतः जळाला आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विद्युत प्रवाहाच्या तारेने आग लागल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.