गणेशपूर येथे पहिल्या स्वतंत्र महिला जीमचे उद्घाटन
अत्याधुनिक साहित्यासह पारंपरिक व्यायामाचे मिळणार प्रशिक्षण
बहुगुणी डेस्क, वणी: महिलांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे. यात व्यायामाचा अभाव, वेळोवेळी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष याने त्या अधिकच वाढत आहेत. महिलांच्या दैनंदिन धावपळीत व्यायाम होत नाही. त्यातच महिलांसाठी स्वतंत्र अशा व्यायामशाळेचा अभाव, व्यायामाबाबत अनभिज्ञता यामुळे व्यायामशाळा गरजेच्या बनल्या आहेत. वणी शहरालगत गणेशपूर येथे खास महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळेचे दिनांक 11 ऑक्टोबरला गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
गणेशपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या छोरीया टाउनशिप येथील जलतरण केंद्रात तालुक्यातील पहिली स्वतंत्र महिला व्यायामशाळेचे गणेशपूरचे सरपंच तेजराज बोढे यांच्या हस्ते फीत कापून रीतसर उदघाटन करण्यात आले. अत्याधुनिक ट्रेडमिल, इलेफ्टिकल बाईक, स्पेन बाईक, वायब्रेटर, ट्विस्टर, मल्टिजीम अशा अनेक प्रकारच्या अत्याधुनिक साहित्यासह इथे जलतरण, एरोबिक, कराटे आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे. यासोबतच आहार आणि व्यायामाचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.
जलतरण केंद्रावर झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या मंगला ताई पावडे, उपसरपंच रवी काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिनकर पावडे, ग्रामसेवक एम जे माने साहेब, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा गुहे, संध्या आत्राम, सुनीता मेश्राम, विजय काकडे माजी सदस्य, भगवान मोहिते, सुनील काळे ,मारोती धांडे, सहित कराटे प्रशिक्षक मोहफिज सिद्दीकी, लाठी काठी प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे, जलतरण प्रशिक्षक अक्षय सातपुते, अंकुश कोणतांमवार, महिला व्यायाम शाळा प्रशिक्षक अश्विनी धांडे, दीपाली कोमलवर, सोमेश तांबे, दीपक एदलावर, त्याचप्रमाणे संचालक पल्लवी मॅडम, सुधीर साळी उपस्थित होते.