वाचनच ज्ञान समृद्धीचे साधन: सोनाली भोयर

कायर येथील विवेकानंद विद्यालयात वाचन दिन साजरा

0

सुरेन्द्र इखारे, वणी: कायर येथील विवेकानंद विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ अध्यापक अविनाश ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी संस्था सचिव सतीश घुले, सुरेन्द्र इखारे, सोनाली भोयर, रविकांत गोंलावार उपस्थित होते.

या प्रसंगी विचार व्यक्त करताना सोनाली भोयर म्हणाल्या की आपल्याला चांगला माणूस व्हायचे असेल तर विविध विषयांचे वाचन आवश्यक आहे त्यातूनच ज्ञान समृद्धीच होते आज काळाबरोबर प्रगती करायची असेल तर वाचनच ज्ञान संपादन करण्याचे साधन आहे. असे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेन्द्र इखारे यांनी केले तर आभार सेजल वरखडे व सोयाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी आकाश बोरूले, अशोक लोणगाडगे यांनी सहकार्य केले

Leave A Reply

Your email address will not be published.