येनक येथील गणपत पंडिले यांचे निधन

नागपूरच्या खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार

0

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील गणपत दत्तूजी पंडिले (31) यांचे आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दि.16 बुधवारला निधन झाले. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. एका खासगी रुग्णालयात सतरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक तीन महिन्यांची मुलगी, भाऊ, वहिनी असा बराचसा आप्त परिवार आहे. होतकरू तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Podar School 2025

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.