विद्यानिकेतन शाळेचे पार पडले स्नेहसंमेलन

स्नेहसंमेलनादरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन

0

रोहन आदेवार, मारेगाव: मारेगाव येथील विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मारेगाव येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. दि 12 जानेवारी 2018 ते 15 जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्याच्या कलागुणांचा वाव मिळावा व त्याच्या अंगी असलेली कला समोर यावी या उदेशाने हा कार्यक्रम घेतला जातो.

दि.12 जानेवारी ला सकाळी 9 वाजता युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मुलांनी स्वामी विवेकानंद व मुलींनी जिजाऊ माता अशी उत्कृष्ट वेशभूषा करून बँन्ड पथकासह संपूर्ण मारेगाव मथ्ये रॅली काढली. त्यानंतर उत्कृष्ट सजावटी साठी बक्षीस वितरण करण्यात आले. या स्नेह संमेलनामध्ये ग्रुप डान्स, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विद्यार्थांच्या पालकांसाठी कारोके साँग, कपल अंताक्षरी, सिंगल डान्स, कला संवर्धन असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून इंदूताई किन्हेकार (अध्यक्ष नगर पंचायत मारेगाव), शीतलाताई पोटे (अध्यक्ष पंचायत समिती मारेगाव) व माळवे साहेब (ठाणेदार मारेगाव) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दि.15 जानेवारी सोमवारला अतिथी म्हणून ऍड. गजानन कनाके (बिल्डिंग अँड कँट्रक्शन डिपार्टमेंट नगर पंचायत मारेगाव), विजय साळवे (तहसीलदार मारेगाव), स्नेहल आंबडकर (BEO पंचायत समिती मारेगाव)
उपस्थित होते. त्यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे अध्यक्ष संध्या राजेश पोटे, जोत्स्ना बोंन्डे (प्राचार्य) व सर्व शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.