बहुगुणी डेस्क, वणी: स्नेहसंमेलन म्हटलं की चिमुकले असोत की युवा सगळेच धमाल करतात. आपल्या कलागुणांचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकतात. असाच एक प्रत्यय चिमुकल्यांनी नुकताच दिला. येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या जवळ न्यू निवेदिता पब्लिक स्कूल आहे. येथे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी शारदापूजन झाले. त्यानंतर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेत.
त्यामध्ये रुद्र मोहु्ले, कोमल दिकुंडवार, दुर्गेश नालमवार, आराध्या कुत्तरमारे, आराध्या बिहारी,आरोही भांडेकर, आरोही हांडे, विक्रांत दोडके, तनिष्क नक्षीने, कनिष्का गिरुडकर, अर्पित संदूरकर, भूपेश लांजेवार, उमर शेख, कौसर शेख, आरुषी राळे, शर्वरी मोहुर्ले, लावण्या झिलपे, आभा क्षीरसागर, रुचिता गोडे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षा शालू गंगशेट्टीवार या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कविता सुरावार या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका किरण कुंचमवार यांनी केले. तर संचालन सपना कुंचमवार यांनी केले. आभार प्रदर्शन कविता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेबी गटलेवार आणि सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.
Comments are closed.