वणीत भारिप बहुजन महासंघातर्फे घंटानाद आंदोलन
वणी/ विवेक तोटेवार; वणीत मंगळवारी सकाळी 10 .30 वाजता भारिप बहुजन महासंघाद्वारे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगलीचे प्रमुख सूत्रधार असणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ भीडे गुरुजी यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक करावी. यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा मोठा फायदा होतो. मात्र सरकारने अनेक शिष्यवृत्ती बंद केल्या आहेत. तसंच विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शैक्षणिक फी वसुल केली जात आहे. शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यांना थकीत शिष्यवृत्ती दयावी.यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या ही कर्जबाजारी पणामुळे झाली आहे. सरकारने असा दावा केला होता की, आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु याबाबत कोणत्याहो ठोस पाऊल अजूनही उचलले गेले नाही. अशा विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकारला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी म्हणून एक आगळेवेगळे व सर्व जनतेचे व सरकारचे लक्ष वेधनारे असे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मंगल तेलंग, किशोर मुन, प्रशिल तामगाडगे, सुषमा दुधगवळी, कीर्ती लभाणे, डोंगरे, प्रकाश मुन, गौतम जुमळे, प्रकाश दुर्गे, शंकर रामटेके, अजय खोब्रागडे, राजू चापडे, गणेश वाघमारे, रमेश तेलंग, सज्जन रामटेके, सतीश गेडाम, राहुल गेडाम व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
लिंकवर क्लिक करून पाहा आंदोलनाचा व्हिडीओ…