पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू

जळका पोड येथील घटना, गो-ह्याचाही कुत्रा चावल्याने मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पिसाळलेला कुत्रा चावून एका 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळका पोड येथे घडली. मृत बालिकेचे नाव कल्याणी शालीक आत्राम असे आहे. तसेच या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका गो-्ह्याचा देखील मृत्यू झाला.

Podar School 2025

सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेला सकाळच्या वेळेस हा पिसाळलेला कुत्रा जळका पोड येथे गेला. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान नाल्यावर 13 वर्षीय कल्याणी शालीक आत्राम ही कपडे धूत होती. यावेळी हा कुत्रा या कल्याणीच्या पायाला चावला. एकाएकी झालेल्या या हल्याने कल्याणी घाबरली आणि ती तिथेच पडली. त्यामुळे हा कुत्रा पुन्हा तिच्या मानेला चावला असेही कळाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुलीला कुत्रा चावल्यानंतर पोडावर गेला. तीथे पुन्हा एका मुलाला चावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी लगेचच कुत्र्याचा पाठलाग करून मारून टाकले.

कुत्रा चावल्यानंतर मुलीवर वणी आणि यवतमाळ येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. पण तीच्यावर शेवटी काळाने झडप घातली आणि दि. 17 सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुत्र्याने चावा घेतल्याने गो-ह्याचाही मृत्यू
गावात येताच या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातीलच कल्पक खडसे यांच्या 6 महिन्याच्या गो-ह्याला चावा घेतला. तसेच गावातीलच दोन ते तीन कुत्र्यांना सुद्धा चावा घेतल्याचीही चर्चा आहे. यातील खडसे यांनी व इतर कुत्रा मालकांनी आपल्या जनावरांना इंजेक्शन दिले. दोन ते तीन इंजेक्शन देऊनही खडसे यांचा गोऱ्हा मरण पावला.

हे देखील वाचा:

Comments are closed.