बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका 17 वर्षीय कुमारिका कापूस वेचायला शेतात गेली होती. मात्र संध्याकाळी ती घरी आलीच नाही. अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या पालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, पीडिता ही 17 वर्षांची असून ती मारेगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती तिच्या आई, वडिलांसोबत राहते. पीडित मुलगी ही शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावायची. दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पीडिता ही गावातील महिला सहका-यासह ऑटोत बसून म्हैसदोडका शिवारात कापूस वेचण्यासाठी गेली होती.
संध्याकाळी इतर महिला घरी परत आल्या. मात्र पीडिता ही घरी परत आली नाही. त्यामुळे पीडितेच्या आई वडिलांनी मुलीचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे कॉल करून विचारणा केली. मात्र पीडितेचा काहीही पत्ता लागला नाही.
अखेर पालकांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मारेगाव पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.
29 डिसेंबरला T-10 चॅम्पियन लीगचा उद्घाटन सोहळा, गौतमी पाटील प्रमुख आकर्षण
Comments are closed.