प्रेयसीची प्रियकराविरोधात तक्रार, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमसंबंधात फसवणूक; प्रियकराविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: दोघांची अनेक वर्षांपासून ओळख होती. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झालेत. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. मात्र लग्नाची गोष्ट काढताच प्रियकर टाळाटाळ करीत होता. जेव्हा प्रियकर लग्न करणार नाही, याची खात्री प्रेयसीला खात्री पटली, तेव्हा प्रेयसीने प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र ही बाब कळताच प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही सिनेमाला शोभेल अशी कथा वणी शहरात घडली आहे.

फिर्यादी तरुणी (25) ही वणीतील रहिवासी आहे. तर आरोपी मोहम्मद हकिमोद्दीन पठाण (30) हा मेघदूत कॉलोनी (चिखलगाव) वणी येथील रहिवासी आहे. तो वेकोलित नोकरी करतो. त्याची फिर्यादी तरुणीशी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सोबत जगण्या मरण्याच्या शपता झाल्या. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झालेत. 2020 मध्ये आरोपी तिला निलगिरी बन येथे घेऊन गेला होता. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले.

दरम्यान तरुणी ही आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र आरोपी सातत्याने टाळाटाळ करीत होता. दरम्यान शुक्रवारी दिनांक 25 जुलै रोजी प्रियकर रात्री 12 वाजता पीडितेच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पुन्हा लग्नाचा विषय काढत तरुणीसोबत संबंध निर्माण केले. मात्र त्यानंतर प्रियकराने लग्नाचा विषय टाळला. अखेर तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध निर्माण केले याची याची खात्री झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रियकर लग्नास नकार देत असल्याने प्रेयसीने वणी पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरोधात तक्रार दिली. याची माहिती आरोपीला मिळताच त्याने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरुवातीला आरोपीला वणी व त्यानंतर नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या आरोपीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी मोहम्मद हकिमोद्दीन पठाण (30) रा. मेहदूत कॉलोनी वणी याच्याविरोधात बीएनएसच्या कलम 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.