कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मागण्या मान्य न केल्यास 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
भास्कर राऊत, मारेगाव: कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समावेश करावा व समान काम समान वेतन या धर्तीवर सरसकट 15,000 रू वेतन द्यावे इत्यादी मागण्यांसाठी कोतवाल संघटनेतर्फे मारेगाव मध्ये मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कोतवालांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यभरात कोतवाल संघटनेद्वारा निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे. जर मागण्या मान्य न केल्यास 15 ऑगस्टपासून उपोषण करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.
15 हजार वेतन याशिवाय वेतनवाढीविरोधातील तरतूद रद्द करणे, कोतवाल यांना तलाठी, महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी 50 %आरक्षण मंजूर करणे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गाातून भरव्या. कोरोनाने मयत झालेल्या कोतवालांच्या वारसास अनुकंपा तत्वावर सेवेत समावेश करावा, सेवानिवृत्त कोतवालास 10 लाख रु. निर्वाह भत्ता मिळण्याबाबत. तसेच कोतवाल यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करावी इत्यादी मागण्या कोतवाल संघटनेच्या आहेत.
निवेदन देते वेळी मारेगाव तालुका संघटनेचे अध्यक्ष सुरेश येरमे, उपाध्यक्ष गणेश उराडे, सचिव अतुल बोबडे, यांचेसह रोशनी वरखडे, कल्पना नंद्रे, अमित येवले, जगदीश कनाके, योगेश भट, देवानंद मोहुर्ले, विनोद मडावी, अशोक पेंदोर, लहु भोंगडे उपस्थित होते.
हे देखील वाचा:
अधिकारी कार्यालयात टुन्न…. कोतवाल संघटनेची निवेदनाद्वारे तक्रार