उद्या लालपरीची वाहतूक होणार विस्कळीत? संपाचा वणीकरांना फटका

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, पम्पावर गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: वाहन चालकांच्या संपाचा प्रभावामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज ही नागरिकांनी पेट्रोल पम्पावर गर्दी केली होती. मात्र सोमवारपेक्षा ही गर्दी कमी होती. सध्या नागपूरला जाणाा-या ट्रॅव्हल्स बंद असल्याने वणीकरांना नागपूरला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर एसटी डेपोकडेही केवळ मोजका डिझेलचा साठा असल्याने उद्या बुधवारी लालपरीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पेट्रोल पम्पावर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

आज मंगळवारी दिनाक 2 जानेवारी रोजी संपाचा फटका वणीकरांना बसला. वाहतूक बंद असल्यान भाज्यांची आवक काही प्रमाणात घटली होती. शहरातील लाठीवाला व चिखलगाव येथील रिलायन्स पेट्रोल पम्प सुरु असल्याने या दोन पेट्रोल पम्पवर वाहन चालकांची गर्दी दिसून आली. वणीतून रोज सुमारे 400 ते 500 प्रवासी नागपूरला जातात. ट्रॅव्हल्स बंद असल्याने प्रवाशांनी एसटी बससाठी धाव घेतली. मात्र नागपूरसाठी अगदी मोजक्या बसेस असल्याने प्रवाशांची निराशा झाली. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नागपूरसाठी अधिकच्या फे-या सुरु न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही प्रवाशांनी खासगी वरोरा येथे जाऊन चंद्रपूर-नागपूर स्लिपर बस पकडून प्रवास केला.

लालपरीला बसणार फटका?
आज रोजप्रमाणे महामंडळाची बस सेवा सुरू होती. मात्र डेपोकडे पेट्रोल साठा मोजका उपलब्ध असल्याने उद्या (बुधवारी) काही प्रमाणात बस सेवेवर फरक पडू शकतो. जर उद्या पेट्रोल साठा उपलब्ध झाल्यास नेहमी प्रमाणे वाहतूक सुरू राहील. अशी माहिती एसटी डेपो तर्फे ‘वणी बहुगुणी’ला देण्यात आली. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात पेट्रोल व डिझेल टॅंकरने पुरवठा होणार असल्याचे पुरवठा विभागाने जाहीर केले आहे.

पेट्रोल पम्पवरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.

‘हिट अँड रन’ कायद्याचा संपूर्ण देशात विरोध होत आहे. अपघात झाल्यावर घटनास्थळी न थांबता पळून जाण्याला हिट ऍन्ड रन म्हटले जाते. या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघात झाल्यानंतर चालकाने याची माहिती न देता किंवा जखमीला उपचारासाठी मदत न करता पळ काढल्यास त्याला त्याला दहा वर्षे शिक्षा व 7 सात लाख रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

अपघात झाला की जखमींना वैद्यकीय मदतीसाठी थांबण्याऐवजी चालक भीतीने पसार होतात. दरम्यान वैद्यकीय मदत वेळेत किंवा उशिरा न मिळाल्याने यात जखमीचा मृत्यू होता. त्यामुळे हा नवीन कायदा करण्यात आला. मात्र अपघात झाल्यास उपस्थित नागरिक हिंसक होतात. त्यात चालकाला मारहाण होते. प्रसंगी जीव ही जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या नवीन कायद्याला वाहन चालकाचा विरोध आहे.

हे देखील वाचा: 

वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला

ग्रामीण भागातील खेळाडुंनी कबड्डीकडे करिअर म्हणून पाहावे – संजय खाडे

Comments are closed.