रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

महिला गावात गेल्याची संधी साधून चोरट्यांनी साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी : घरी कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले तब्बल 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविनगर भागात 4 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेबाबत नीता बबबनराव बधकुले यांनी बुधवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
प्राप्त माहितीनुसार ग्रामीण रुग्णालयात वणी येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत नीता बधकुले रविनगर येथील प्रसाद देशपांडे यांच्या घरात भाड्याने राहते. दि.4 सप्टेंबर रोजी नीता बधकुले काही कामानिमित्त हिंगणघाट येथे गेले होत्या. तर त्यांच्या बाजूच्या खोलीत भाडेकरु महिला 3 सप्टेंबर रोजी गावात गेली होती. दि.5 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता शेजारील भाडेकरू महिलेने नीताला फोन करुन तिच्या खोलीचा कुलूप तुटून असल्याचे तसेच दोघींच्या खोलीमधले दार उघडून असल्याचे कळविले.
नीता हिने सायंकाळी घरी येऊन बघितले असता रुम मधील सामान अस्तव्यस्त पडून होता. तर लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, कानातले खडे, 3 आंगठी व रोख 1500 रुपये असे एकूण 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. घटनेबाबत नीता बबनराव बधकुले (40) रा. रवीनगर हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380,457 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.