झरी तालक्यात अनंतपूर मार्गावर पायदळ गोतस्करी जोमात
● दिपाईगुडा येथील गावकऱ्यांचा गोतस्करांना चोप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिग्रस अनंतपूर या मार्गावर पायदळ गो तस्करी करण्यात येत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आधी तर गोतस्कर म्हैस, हल्ले, बैलांची तस्करी करत होते. मात्र आता गो तस्करी करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बोरी येथील मोहसिन, शगिर, आरिफ व साबीर नामक तरुण झरी तालुक्यातील माथार्जुन, शिबला, पांढरवाणी, मांगुर्ला, खडकडोह, निमनी, मांडवा, जाणोनी, सुर्ला, पिवरडोल, गवारा, मुळगव्हान, चिखलडोह व इतर गावात मजूर घेऊन जातात. तिथे ते शेतक-यांकडून कवडीमोल भावात गाय व बैल खरेदी करीत आहे.
परिसरातील जनावर खरेदी करून सदर तस्कर माथार्जुन येथे जमा करतात. गुरुवार, शुक्रवार व शनिवारला रात्री पायदळ गायी व बैलांची तस्करी केली जाते. माथार्जुन जनावर तस्करांचा मोठा अड्डा असून इथूनच पायदळ जनावरे नेली जाते.
गेल्या आठवड्यात तेलंगणातील दिपाईगुडा येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीने कत्तली करीत नेत असलेल्या 18 गायी पकडल्या व त्या तस्करांना चोपही दिल्याची माहिती आहे. राजरोसपणे जनावर तस्करी होत असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्यावर अद्याप कार्यवाही केली गेली नाही.
तालुक्यात दोन गोरक्षण असून अध्यक्ष किंवा सदस्य सुद्धा कोणतीही हालचाल करीत असताना दिसत नाही. तरी पोलिसांनी जनावर तस्करांना बेड्या ठोकून त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.