तांत्रिक कामगार संघटनेचे रक्तदान शिबिर

वर्धापनदिनी शिबिरात 53 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तांत्रिक कामगार संघटनेच्या मारेगाव शाखेचा 43 व्या वर्धापनदिन साजरा झाला. त्याचे औचित्य साधून येथील बदकी भवनमध्ये रक्तदान शिबिर घेऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्याचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तांत्रिक कामगार संघटनेने सामाजिक बांधीलकी जोपासत हे शिबिर घेतले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्युत महामंडळाचे पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता एम.एस.वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डी. एच. बिहाळे होते. प्रमुख पाहुणे वणी येथील उपकार्यकारी अभियंता व्ही.पी. मानकर व मारेगांव येथील उपकार्यकारी अभियंता आर.बी.खोंडे तसेेेच मारेगांव येथील युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश बदकी उपस्थिती होते.

हे रक्तदान शिबीर डी.एच.बिहाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी तांत्रिक कामगार संघटनेचे प्रफुल्ल रासेकर, नीलेश चिपळे, तुषार जिवतोडे, सचिव गणेश चांदेकर, जी.मु.पारखी, जी.एस. राठोड, आर.एस.भरणे, बदखल, रामटेके, एल.व्हि.भगत, तेलंग आदींनी परिश्रम घेतलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.