मांगली येथून तेलंगणात मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी
माजरी व वरोरा येथील पिकअपने केली जाते जनावर वाहतूक
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावातून चारचाकी वाहनाने तेलंगणात मोठ्या प्रमानातून जनावर तस्करी सुरू असून पोलीस अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. माहिती नुसार मारेगाव, वणी,वरोरा येथील जनावर तस्कर निमनी ते घोंसा मार्ग अडकोली, पांढरकवडा (लहान) अर्धवन, भेडाला मांगली वरून पैनगंगा नदीच्या तीरावर सरळ कुणालाही न घाबरत चारचाकी ने मोठ्या प्रमाणात तेलंगणात कत्तलीकरिता जनावर तस्करी सुरू असून याकडे पोलीस आंधल्याचे सोंग घेऊन बसून असल्याचे पहायला मिळत आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव, वरोरा, वणी येथे बैलबाजार भरत असून सदर बाजारातील शेतकऱ्यांचे गाय व बैल जनावर तस्कर कवडीमोल भावात खरेदी करून कत्तलीकरिता बुधवार, रविवारला वरील मार्गाने तेलंगणात तस्करी करतात ज्यात लाखो रुपयांची उलाढाल केल्या जाते. जनावर तस्करी मांगली येथून भवानी मंदिर रोडने पैनगंगा नदीच्या तीरावर नेल्या जाते व त्याच ठिकाणी तेलंगणातील भेदोडा, मजरा व बेला या गावासह इतर गावातील चारचाकीने महाराष्ट्रातील जनावरे घेऊन जातात.
जनावर चारचाकीत कृरतेने कोंबून पाय बांधून टाकतात ज्यामुळे अनेक जनावरांची पाय तुटतात तर अनेक जनावरे मृत्यू पावतात अश्याप्रकारे क्रूरतेने जनावर तस्करावर कार्यवाही करण्याऐवजी पोलीस कुंभकर्णी झोपेत दिसत आहे. सदर जनावर तस्करीत मांगली येथील एक तरुणी २ हजार रुपये हप्त्याने ठेवली असून जनावरांची किंवा दारू भरून जाणाऱ्या गाडी मालकांना सर्व लोकेशन देत असल्याची माहिती आहे.तस्कर दर बुधवार व रविवारला ४ ते ५ मॅक्स पिकअपने शेकडो जनावरे तस्करी करत आहे.
तस्करी करिता मदिना गुड्स ग्यारेज वरोरा व माजरी अशी चारचाकीवर नाव लिहलेले असून या चारचाकीचा वापर केला जातो.जनावर तस्करी रात्री १० वाजताच्या नंतर केल्या जात असल्याची माहिती होती परंतु आता सायंकाळी ७ ते ८ वाजताच ही जनावर तस्करी होत आहे.ज्यामुळे वेगळेच संशय बळावले असून सदर तस्करीला कुणाचे अभय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जनावर तस्करीला बंदी असताना एवढे खुलेआम जनावर तस्करीवर कार्यवाही होत नसल्याने पोलीस खात्यातील पथकवरही संशय व्यक्त केल्या जात आहे.जनावर तस्कर काही पोलिसांना हातात धरून तस्करी करीत असल्याची ओरड ऐकला मिळत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर जनावर तस्करवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.