झरी तालुक्याला अवकाळी पाऊस व  वादळी वाऱ्याचा फटका

सततच्या वीज पुरवठा खंडितमुळे सर्वसामान्य हैराण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळ व वाऱ्यामुळे जनता हैराण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळ वाऱ्याचे सर्वाधिक फटका वीज वितरणला बसत असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे. तालुक्यात पाटण, झरी, रुईकोट, अडेगाव असे तीन सब स्टेशन असून तिन्ही सबस्टेशन मिळून १०६ गावात वीज पुरवठा केला जातो. परंतु गेल्या ८ दिवसापासून तिन्ही सबस्टेशनवर येणाऱ्या ३३ केव्ही व त्यातून निघालेल्या ११ केव्ही लाईनवर ब्रेक डाऊन आल्याने तालुक्यातील अनेक गावे अंधारात होते तर अनेक ठिकाणी झाडे तुटून इलेक्ट्रिक लाईनवर पडल्याने सुद्धा अनेक गावे अंधारात होते. 

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी शॉट सर्किट झाले ज्यामुळे अनेक गावातील जनतेचे उपकरण जळाले तर वीज वितरणचे ट्रान्स्फर सुद्धा जळाले. ज्यामुळे शेतकरी सह साधारण माणूस हैराण झाले.उन्हाळा सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला असून कधी दिवसभर लाईन नाही तर कधी रात्रभर लाईन नाही ज्यामुळे लहान मुलासह वयोवृद्धना गर्मीत रहावे लागत होते. वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला तर अनेक गावातील ग्रामपंचायतिना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली. तालुक्यातील ४ सबस्टेशनवर पाटनबोरी येथून वीज पुरवठा होतो.

बोरी ते पाटण, पाटण ते झरी व रुईकोट तर बोरीला पांढरकवडा येथून वीजपुरवठा होतो. बोरी ते पाटण,रुईकोट झरी या कोणत्याही पुरवठ्यावर बिगाड झाले की मुकुटबन येथील वीज खंडित होते ज्यामुळे मुकुटबन वासीयांना वीज खंडीतचा मोठा फटका बसतो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वच सबस्टेशनवर गेलेली लाईन ही जंगलातून असल्याने वादळी वाऱ्याचा त्रास जास्त होतो.

वरिष्ठ अभियंता राहुल पावडे व त्यांची टीम देवगडे चामाटे व इतर अधिकारी व कर्मचारी आल्यापासून रात्रीच्या तीन चार वाजेपर्यंत लाईनचे काम करून जनतेला होणारे त्रास कमी करीत आहे. तसेच पोल पडलेले असो की डीपी चे काम सर्व कर्मचारी घेऊन स्वतः पावडे उभे राहून काम करून घेत असल्याने जनतेेेत समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.