शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !
शासनातर्फे पुरेशी व्यवस्था नसतानाही पोलीस ऑन ड्युटी 24 तास
जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची व्यवस्था करीत असताना रस्त्यावरच्या सैनिकांसाठी मात्र, शासनाकडे काहीही तरतूद नाही. हे खाकीचे दुर्दैव की गृहत धोरणाच्या परंपरेचा भाग, हा प्रश्न सुन्न करणारा आहे.
मागील आठ दिवसांपासून संपूर्ण देश घरामध्ये बसला आहे. मात्र रूग्णालयात आरोग्य कर्मचारी तर रस्त्यावर पोलीस कर्मचारी कोरोनाच्या आगमनाला धैर्याने सामोरे जात आहेत. 16 – 16 तास रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. शासनाने नुकताच आरोग्य कर्मचान्यांना ५० लाखाच्या विम्याचे कवच बहाल केले आहे. ही स्वागताहार्य असली तरीही, त्याच धर्तीवर किंबहुना अप-या साधनानीशी अतिशय धक्कादायक स्थितीत रस्त्यावर कोरोनाशी लढा देणारे पोलीस प्रशासन शासनाच्या लेखी पुन्हा दुर्लक्षीत राहिले असल्याचा मतप्रवाह आहे.
नागरिकांनो , थोडातरी संयम बाळगा
संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठीच पोलीस कर्तव्यावर आहेत. नागरिकांना या जीवघेण्या आजाराची लागण होवू नये, हाच उद्देश आहे. ते आपल्या घरात स्वस्थ वसण्याची विनवणी करीत असताना ते कुटुंबापासून आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून दूर राहून रस्त्यांवर कोरोनाशी मुकाबला करीत आहेत. त्यांनी एखाद्यावेळी वळाचा वापर केला तर त्याचा कांगावा केला जातो. मात्र त्यांच्या ठिकाणी एकदा स्वत : ला ठेऊन विचार केला तर परिस्थितीचे गांभिर्य ओळखता येऊ शकते.