गोवारी येथे वीज पडून दोन बैल ठार

खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचे नुकसान

0
विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील शेतात वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना दि. २२ शनिवारी चार वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात शेतकरी सूर्यभान किसन बदखल यांच्यासह अन्य मजूर बचावले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुपारी चार वाजताच्या दरम्यान गोवारी येथे विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. बदखल यांच्या शेतात कपाशीची टोबणी सुरु होती. यावेळी मजुरांनी झोपडीत आसरा घेतला. तर बैलजोडी झाडाखाली उभी होती. अचानक वीज कोसळली यात बैलजोडी घटनास्थळीच ठार झाली. यावेळी बाजूला उभ्या असलेल्या सूर्यभान बदखल यांना थोडा झटका बसला. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या घटनेची माहिती शिरपूर पोलिस आणि तलाठी यांना दिली आहे. यात बदखल यांचे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बदखल यांच्याकडे आठ एकर शेती आहे. ऐन खरिप हंगामात बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. घटनेचा पंचनामा करून महसूल विभागाने त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.