गोवारी येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू

0

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील गोवारी (पारडी) येथे एसीसी ट्रस्ट, दिलासा जनविकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत गोवारी यांच्या संयुक्त विद्यमाने जलशुद्धीकरण व शितकरण केंद्र सुरू करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने सदर उपक्रम राबविण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना पाच रुपयात वीस लिटर शुद्ध आणि शीत जल उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एसीसी आणि दिलासा जनविकास प्रतिष्ठानचे आभार मानले. एसीसी आणि दिलासा प्रतिष्ठाण कडून परिसरातील गावांत समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.