लुबाडणूक – ग्रामपंचायत निवडणूक ऑफलाईन अर्जाचा फार्म 50 रुपयात

तहसील जवळ झेरॉक्स सेंटरवर फार्मचा काळाबाजार

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशन फॉर्म निवडणूक विभागाकडे विना शुल्क उपलब्ध असताना काही झेरॉक्स सेंटरवर फार्म 50 रुपयात विकले जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 10 पानाचे नामनिर्देशन फॉर्मची झेरॉक्स काढून ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांना लुबाडण्याचे प्रकार अगदी तहसील कार्यालय जवळ होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन नामनिर्देशन वेबसाईटमध्ये बुधवारी तांत्रिक बिघाड आल्यामुळे निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन करण्याची सूचना केली. त्यामुळे अखेरच्या क्षणी फॉर्म मिळविण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली.

तहसील कार्यालयात अर्ज घेण्यासाठी पोहचलेल्या नागरिकांना अर्ज झेरॉक्स केंद्रावर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. नाईलाजास्तव निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी झेरॉक्स केंद्रामधून 50 रुपयात एक फॉर्मप्रमाणे अर्ज विकत घेतले. याबाबत तहसील निवडणूक कार्यालयाचे नायब तहसीलदार कापसीकर यांना विचारणा केली असता तहसील कार्यालयात तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडे विनामूल्य अर्ज उपलब्ध असून उमेदवारांना बाहेरून फॉर्म घेण्याची गरज नसल्याचे सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.