मारेगाव तालुका ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन
नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले. जो पर्यंत मागण्या मंजूर होणार तो पर्यंत काम बंद आंदोलन ठेवणार असल्याचा इशारा मारेगावच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ग्राम रोजगार सेवकांनी दिला आहे.
यामध्ये ग्राम रोजगार सेवकांना अठरा हजार रूपये मानधन देण्यात यावे, इतर राज्यांप्रमाणे ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत आरक्षण देऊन सेवेत समाविष्ट करण्यात यावे, मानधन ग्रा.पं.च्या खात्यात जमा न करता त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे, कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा, म.ग्रा.रो.यो.ची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी गजानन बोधे, खुशाल येरगुडे, सिद्धार्थ खैरे, महादेव गुरनुले, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, प्रेमदास जाधव, योगेश्वर कापसे, मनोज ददांजे, सुरेश शिवरकर, अंकुश बावने, राजकुमार राजगड़कर, प्रशांत सपाट, अमोल कोहळे, प्रेमानंद नागभीड़कर, प्रवीण सुरसे, शुभम येडमे, रमेश सिडाम, रवी आत्राम, गणपत मडावी आदी ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.