ग्राम स्वराज अभियानांतर्गत अमरावती परिमंडळातील 1523 कुटुंबांना वीजजोडणी

देशात महाराष्ट्राकडून निर्धारित वेळेपूर्वीच उद्दिष्टांची पूर्ती

0

गिरीश कुबडे,अमरावती: ग्राम स्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील 38 गावातील 1523 लाभार्थ्यांना तर राज्यात 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहेण् देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम
उद्दिष्ट गाठले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिण् 14 एप्रिल 2018 ते 5 मे 2018 पर्यन्त राज्यात “ग्रामस्वराज्य अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात “सौभाग्य” योजनेतून राज्यातील ज्या 192गावात 80 टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्ररेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना 100 टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या 23 जिल्हयांतील 192 गावात वीजजोडणीनसलेल्या सर्व लाभार्थ्यांना 5 मे 2018 पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट 01 मे 2018 रोजीच पूर्ण केले असून या 192 गावातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक ; प्रकल्प दिनेशचंद्र साबु, कार्यकारी संचालक ;पायाभूत आराखडा प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीआणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना मागील 16 दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, त्यात अमरावती परिमंडळातील 38 गावाचा समावेश आहे, यामध्ये यवतमाळ जिल्हयातील 13 तर अमरावती जिल्हयातील 25 गावात अनुक्रमे 788 व 735 कुटूंबांना वीज जोडणी देऊन परिमंडळातील 38 गावातील वीज जोडणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.