झरी तालुक्यात दिग्गजांना हादरा, मतदारांची परिवर्तनाला पसंती
महाविकास आघाडी समर्थकांची आघाडी, मुकुटबन येथे त्रिशंकू परिस्थिती
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालात कुठे खुशी तर कुठे गमचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. निकालाचे परिणाम पाहता महाविकास आघाडीने बहुतांश जागेवर विजय मिळवित 15 ते 25 वर्षांपासून काबीज असलेल्या ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
या निवडणुकीत तालुक्यात सर्वाधिक चर्चा आहे ती दिग्गजांच्या पराभवाची. जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर व पंचायत समिती सदस्य सुरेश मानकर यांच्या मांगली गावात त्यांचे एकही उमेदवार निवडून आले नाही. खातेरा येथील 25 वर्षांपासून माजी तालुका अध्यक्ष बंडू व-हाटे यांच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात जाऊन सर्व उमेदवार निवडून आले आहे. पंचायत समिती सभापती यांच्या मांडवी गावात महाविकास आघाडीने बाजी मारली असून सभापती यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.
लहान पांढरकवडा येथील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांच्या हातात गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार होता. परंतु या निवडणुकीत त्यांनाही केवळ तीन सीटवर समाधान मानावे लागले. मधुकर राजूरकर व बालू चेडे व मित्र परिवार यांचे चार सीट निवडून येऊन ग्रामपंचायत वर ताबा मिळविला आहे.
पाटण येथे बीजेपी मध्ये राम आईटवार व माजी सरपंच प्रवीण नोमुलवार यांचे दोन गट पडून दोन्ही गटाकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. हे दोन पॅनल व महाविकास आघाडी असे तीन पॅनल रिंगणात होते. यात महाविकास आघाडीचे 10 उमेदवार तर राम आईटवार यांच्या पॅनलचा केवळ एक सदस्य निवडून आला आहे. इथेही बिजेपीला मोठा हादरा बसला आहे.
मुकुटबनमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा
मुकुटबन येथे तीन पॅनलमुळे तीन तिघाडा काम बिगाडा झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. शंकर लाकडे यांच्या शेतकरी विकास पॅनलला 6 तर भूमारेड्डी बाजनलावार व भालचंद्र बरशेट्टीवार यांचे शेतकरी शेतमजूर पॅनल यांना 5 जागा तर महाविकास पॅनलचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. इथे कुणालाही बहुमत न मिळाल्याने सर्वांचे गणित बिगडले आहे.
निवडून आलेले उमेदवार:- मुकुटबन येथील गणेश आसुटकर, प्रशांत बघेले, श्यामल अक्केवार, शंकर लाकडे, सुनीता कल्लूरवार, प्रभा पारशीवे, विठाबाई बरलावार, बुधाबाई मंदुलवार, अनिल कुंटावार, मुजहीद सुभान बेग, बबिता मुद्दमवार, संजय परचाके, मीना आरमुरवार व अर्चना चिंतावार
पाटण येथे शेख अमजद, सविता कर्नेवार, दत्ता आईटवार, सुजाता म्यानरवार, शेखर बोनगीरवार, प्रमोद कामनवार, प्रशांती कासावार, भगवान भादीकर, सरिता पालेपवार, रेशमा शेख,
मांगली येथे महेंद्र कांबळे, रेखा ढाले, शशिकला धाकते, श्यामसुंदर चामाटे, सुमन भादिकर, सुशीला सातघरे, आकाश मडावी, गजानन खिरेकर, माया कसोटे, अडेगाव येथे संजय आत्राम, गंगा आत्राम, वंदना पेटकर, संतोष पारखी, भास्कर सूर, माया हिवरकर, अरुण हिवरकर, सीमा लालसरे, दिनेश ठाकरे, निर्मला पानघाटे, सविता आसुटकर.
लहान पांढरकवडा येथे दुर्गा पिंपळकर, माधुरी विंचू, प्रगती चेडे, श्रीकांत कोईचाडे, जयश्री घुगुल, प्रमोद डवरे, विठ्ठल पोटे. खातेरा येथे विशाल ठाकरे, पुष्पा लसने, शारदा ताजने, पुंडलिक वानखडे, मनीषा टेकाम, योगेश मडावी व सुजाता ठाकरे हे निवडून आले आहे.
हे देखील वाचा: