५५ ग्रामपंचायतला कोरोना विषयी उपाययोजना करण्याचे आदेश
गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी पाठविले पत्र
सुशील ओझा, झरी: कोरोना बाबत जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातही विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन खबरदारीचे आदेश संपूर्ण जनतेकडे लक्ष ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी तालुक्यातील सर्व ५५ ग्रामपंचायतीनी स्वतः खर्च करून गावात उपाययोजना करण्याचे आदेशाचे पत्र देण्यात आले.
झरी तालुक्यात १०६ गावे असून प्रत्येक गावाची जवाबदारी ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. कोरोनामुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणसाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी अधिसूचनेच्या दिनांकापासून सुरू करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आपल्या स्तरावर स्वनिधीतून केंद्रशासन व राज्यशासन विविध योजनेतील तरतुदीचा अधीन राहून ग्रामपंचायतिच्या मान्यतेनुसार विविध उपाययोजना करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांनी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत ला दिले आहे.