सायकलीस्ट प्रणाली चिकटेचा मारेगाव, वणी येथे भव्य स्वागत व सत्कार

मंगळवारी वणीत सायकल रॅलीचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पर्यावरणाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करणारी सायकलीस्ट प्रणाली चिकटे हिचे सोमवारी सकाळी परिसरात आगमण झाले. या वेळी ठिकठिकाणी तिचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती. मंगळवारी सकाळी वणीत पर्यावरणाचा संदेश घेऊन प्रणाली चिकटे हिच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पर्यावरणाचा संदेश घेऊन चौदा महिन्यात सुमारे 17 हजारांचा सायकलने प्रवास करून प्रणालीचे सोमवारी परिसरात आगमन झाले. सकाळी 8 वाजता तिचे मारेगाव येथे आगमन झाले. तिथे कला वाणिज्य महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थित प्रणालीचे स्वागत व सत्कार करण्यात आला. दरम्यान तिच्या स्वागतासाठी वणीतून स्माईल फाउंडेशनचे स्वयंसेवक सायकलने मारेगाव येथे दाखल झाले. या चमुसह मारेगावहून प्रणाली वणीच्या दिशेने निघाली.

मारेगाव ते वणी दरम्यान अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा परसोडा येथे विलास जाधव व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थित स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर हा सायकल मार्चचे श्री सद्गुरु बाजीराव महाराज वृद्धाश्रमात आगमन झाले. तिथे वृद्धाश्रमात तर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर चिखलगाव येथील शाळेत तिचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रणालीचे वणीत आगमन झाले. कार्यक्रमाची सांगता आनंद सदन येथे भेट देऊन झाली. यावेळी प्रणालीने पर्यावरणाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

मंगळवारी वणीत सायकल रॅलीचे आयोजन
मंगळवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी प्रणालीच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन वणीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी  8:30 वा. महादेव नगरी चिखलगाव येथून या सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वणीतील विविध भागातून ही सायकल रॅली मार्गक्रमण करणार आहे. वणी येथील पोलीस स्टेशन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी सागर जाधव, पियुष आत्राम, आदर्श दाढे, अनिकेत वासरीकर, महेश घोगरे, ऋषिकेश कामतकर, तुषार वैद्य, निखिल मडावी, कुणाल पायघन, अतुल राठोड, प्रितेश मोहूर्ले, खुशाल मांढरे, निलेश गाडगे, प्रकाश चहानकर, गणेश माणुसमारे, उत्तम लडके यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.