खुनी नदीच्या पात्रात हिवरे पाणी, परिसरात खळबळ

हिरव्या पाण्याचे गुढ कायम, पाणीपुरवठा बंद

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील टाकळी गावाला लागून असलेल्या खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा हिरवा व तेलकट प्रवाह सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात याच नदीद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने लोकांच्या मनात मोठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरूवातीला या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र काही लोकांनी जाऊन पाहणी केली असता. त्यांना हे पाणी स्वच्छ दिसले, मात्र त्याचा रंग हिरवा झाला होता. टाकळी येथील सरपंच संदीप बुरेवार यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खुनी नदीवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाला माहिती दिली.

आरोग्य विभागाची चमू आली व पाण्याचा नमुना घेऊन गेले. तसेच इतरही विभागाचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळाली. टाकळी ग्रामपंचायत द्वारे पहिल्या दिवशी दूषित पाणीपुरवठा करण्यात आला. पावसामुळे खराब पाणी येत असल्याची शंका करण्यात आली. परंतु हिरव्या रंगाचे पाणी येत असल्याची माहिती मिळताच गावात दवंडी देऊन गावातील पाणीपुरवठा बंद केला व नदी काठावरील त्यांच्या जवळील ग्रामपंचायतच्या सरपंच व मित्रांना याची माहिती देऊन पाणीपुरवठा बंद करण्यास सांगण्यात आले.

नदीचे पात्र खूप मोठे असून सध्या ६० ते ७० फूट पात्र भरून असून पूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत आहे. नदीकाठवरील टाकळी, दाभा, सातपल्ली, मांडवी या गावात ग्रामपंचायत द्वारे या नदीच्या पाण्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या गावातील जनतेला सदर पाण्यामुळे धोका तर निर्माण होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरपंच बुरेवार यांच्या सतर्कतेने ही बाब उघडीस आली. त्यांनी वरिष्ठ अधिका-यां पर्यंत माहिती दिल्याने शासन खळबळून जागे झाले व तहसीलदार रामचंद्र खिरेकर, विस्तार अधिकारी इसळकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रफुल्ल चिंतकुंटलावार, सचिव प्रकाश बळीत, आरोग्य सेवक इंगोले यांनी नदीवर धाव घेतली व पाण्याचे नमुने घेतले व चाचणी करीता पाठविले. तसेच केळापुर तालुक्यतील महसूल अधिकारी व कर्मचारी नदी काठावर फिरून सदर हिरवे पाणी बाबत माहिती घेत आहे.

नदीतून वाहणारे हिरवे पाणी हे सांडपाणी असू शकते असा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. सांडपाणी हिरव्या व तेलकट कसा असू शकतो अशी शंका व्यक्त करून तीन दिवस एवढ्या अंतरावरून एवढ्या मोठ्या पात्रातून कसा येतो असाही प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.