परमडोहचे शिक्षक नीलेश सपाटे यांना टीचर इनोव्हेशन अवॉर्ड

यवतमाळ जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

0
विलास ताजने, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर) यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय टिचर इनोव्हेशन अवार्ड नुकताच जाहीर झाला आहे. यासाठी राज्यातील १०५  शिक्षकांची निवड झाली असून यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा परमडोहचे शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे, महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुडाणाचे गजानन शिवाजी गोपेवाड, कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुकळीचे संदीप मधुकरराव कोल्हे यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांना देण्यात येतो.
नीलेश सपाटे, गजानन गोपेवाड व संदीप कोल्हे
यात नीलेश सपाटे यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र भाषा ( मराठी, हिंदी, इंग्रजी ), शीर्षक – ‘अक्षरधारा’ होते, गजानन गोपेवाड यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ), शीर्षक – ‘कृतीयुक्त विज्ञान व  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे’,  तर संदीप कोल्हे यांच्या नकोपक्रमाचे क्षेत्र भाषा ( मराठी, हिंदी, इंग्रजी ), शीर्षक – ‘ अन मुलं कवी झाले ‘ होते.
सदर पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरीय इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इन स्कूल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. एज्युकेशन इनोव्हेशन बँक प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थी गुणवत्तासाठी नाविन्यपूर्ण प्रयोगाचे प्रेरक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, मारोती सोयाम, केंद्रप्रमुख लक्ष्मण इद्दे, शहाजी घुले यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
Leave A Reply

Your email address will not be published.