वणीत कांशिराम यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

कांशिरामजींचे स्वप्न पूर्ण करणे हिच त्यांना आदरांजली: प्रवीण खानझोडे

0

जब्बार चीनी, वणी: बहुजन समाज पार्टी वणी विधानसभाच्या वतीने बसपाचे संस्थापक कांशिराम यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बसपाच्या स्थानिक कार्यालयात ही अभिवादन सभा झाली. यावेळी बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या अभिवादन सभेत पक्षाच्या संघटन बांधणीबाबत आढावाही घेण्यात आला.

यावेळी मत व्यक्त करताना बसपाचे वरिष्ठ नेते दिलिप कोटरंगे म्हणाले की फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्यला प्रमाण मानूण त्यांना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था उभारण्यासाठी कांशिराम यांनी कार्य केले. बहुजनांना त्यांची राजकीय ताकद दाखवून त्यांनी उत्तर प्रदेशात 4 वेळा पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांनी हे यश प्राप्त केले.

बसपाचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण खानझोडे यांनी पक्षबांधणीवर विचार व्यक्त केले. संघटन बांधणी करताना पदाधिकारी व सेक्टर प्रमुख यांनी मिळून फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचा समाज निर्माण करणे हेच खरी कांशिराम यांना आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले.

या अभिवादन सभेला जितेंद्र डाबरे, भीमराव कवाडे, मनोज जीवने, अशोक अंकतवर, किसन कोरडे, सौरभ वानखडे, दीक्षांत भगत यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वरूप व आभार प्रदर्शन महेश लिपटे यांनी केले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.