पावसामुळे वणीकरांच्या आनंदावर विरजण, वणीकरांची निराशा
वादळी वा-यामुळे गुद्दलपेंडी आणि मुर्ख संमेलन रद्द
विवेक तोटेवार, वणी: 21 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वणीत सायंकाळी 7 वाजत हास्य कवी संमेलन व गुदलपेंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 7.15 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान वीज पुरवठाठी खंडित झाला. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले.
वणी शहराची गुद्दलपेंडी हे गेल्या कित्येक वर्षांपासून वणीकरांचेच नव्हे तर विदर्भाचे आकर्षण आहे. अलिकडेच धुलीवंदनाच्या दिवशी आयोजित मुर्ख संमेलन ही वणीकरांचे एक आकर्षण ठरले आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळी अचानक वादळी वा-यासह आलेल्या पावसाने हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे वणीकरांच्या आनंदावर विरजण आले.
नृसिंह व्यायामशाळेच्या पटांगणावर गुद्दलपेंडीचे आयोजन करण्यात आले होते. तर शासकीय मैदानावर मूर्ख संमेलन म्हणजेच हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सात वाजता ठरविण्यात आली होती. हे दोन्ही कार्यक्रम सात वाजता सुरू झाले खरे. मात्र 15 मिनिटांतच सुसाट वारा सुटला. त्यातच वीज सुद्धा गेली. त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमाची वाट वणीकर पाहात असते. दोन्ही कार्यक्रम बघण्यासाठी वणीकर तुफान गर्दी करतात. मात्र यावेळी आलेल्या वादळी वा-याने वणीकरांची निराशा केली आणि वणीकरांना कार्यक्रम रद्द झाल्याने परत जावे लागले.