काकाच्या घरी आलेल्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ

भास्कर राऊत, मारेगाव: काकाच्या घरी आलेल्या पुतण्याचे गळफास लावून आत्महत्या केली. मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये ही घटना घडली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गौरव सुरेश मोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका शिक्षित विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील घोडदरा येथील गौरव सुरेश मोरे हा तरुण वरोरा येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने नुकतीच अंतीम वर्षाची परीक्षा दिली होती. मारेगाव शहरात असलेल्या शिवभोजनचे संचालक राजू मोरे हे गौरवचे काका होतात. राजू मोरे हे दसरा मेळाव्या निमित्त मुंबईला गेले होते. त्यातच सुटी असल्याने तो काकांचे शिवभोजन सांभाळण्यासाठी मारेगावला काकाकडे थांबला होता. तो चार दिवसांपासून व्यवसाय सांभाळत होता.

दुर्गादेवी विसर्जनात मित्रांसह थिरकला
शुक्रवारी रात्री वार्डातील देवीचे विसर्जन होते. त्यासाठी तो गेला होता. विसर्जनाच्या रॅलीत तो मित्रांसह थिरकला होता. विसर्जनानंतर रात्री तो घरी परतला. रात्री तो पहिल्या माळ्यावर झोपायला गेला होता. घरची मंडळी झोपल्याची संधी साधून त्याने छताच्या लोखंडी अँगलला साडीचा दोर करून गळफास घेतला.

सकाळच्या सुमारास त्याचे काका यांनी वर जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. एका शिक्षित मुलाने असे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक गौरव याच्या पश्चात आई, वडील व धाकटा भाऊ आहे. आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.