मुसळधार पावसाने कापूस-सोयाबीन जमिनदोस्त, शेतकरी चिंतेत
कृष्णानपूर, मोहदा व पंचघाट शिवारात अतीवृष्टी; नुकसानभरपाईची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: तीन दिवसांआधी कृष्णानपूर, मोहदा, पंचघाट शिवारात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकरी मधूकर लांडे व शेतक-यांनी निवेदन सादर केले आहे.
दिनांक 1 सप्टेंबर व 2 सप्टेंबर या दोन दिवसांत कृष्णानपूर, मोहदा व पंचघाट शिवारात अती मुसळधार पाऊस झाला. याचा कापूस व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला. कापूस तर जमिनदोस्त झाला. आधीच दुबार, तिबार पेरणीने शेतकरी त्रस्त होता. त्यातच पीक वर आल्यावर आता अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे
या निवेदनावर मधूकर लांडे, प्रदीप ठावरी, बंडू झाडे, सचिन लखमापुरे, अंकुश रा. ठावरी, गणपत आसुटकर, निखिल निखाडे, दिनेश लांडे, अंकुश ह. ठावरी, अरुण ठावरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Comments are closed.