आज शिंदोला येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीसह होणार उपचार

0 300
विलास ताजने, वणी : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) आणि ग्रामपंचायत शिंदोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदोला येथे दि.२४ जुलै रोजी रत्नकला मंगल कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णांनी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत शिबीर स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सदर शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, ताप, हृदयरोग, किडनीचे आजार, दमा, खोकला, हायड्रोसील, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखडा, गलगंड, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार, फॅक्चर, दंतरोग आदी रोगांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. शिबिरात रुग्ण नोंदणी, तपासणी, रुग्णांच्या सर्वसामान्य चाचण्या, राहण्याची व जेवनाची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. सीटी स्कॅन, एमआरआय सारख्या अतिविशिष्ट चाचण्यांकरिता ५० टक्के फी आकारण्यात येईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आजार असल्यास उपचार विनामूल्य केल्या जाणार आहे. शिबीरात येतांना रुग्णांनी आधारकार्ड, राशन कार्ड आणणे आवश्यक आहे. सदर शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मुरलीधर उमाटे,  सामाजिक कार्यकर्ता तुकडोजी पिंपळशेंडे यांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि युवक परिश्रम घेत आहेत.
Comments
Loading...