सावधान ! नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंगोली, माथोली, साखरा, कोलगाव, जुगाद गावांना धोका
बहुगुणी डेस्क: सध्या पावसाचा तडाखा अद्यापही कायम आहे. परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. त्यातच आता बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी मुंगोली, माथोली, साखरा, कोलगाव, जुगाद गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नुकसान भरपाईसाठी संयुक्त पथकाची नेमणूक
अतिवृष्टीमुळे आणि पूर आल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे वणी परिसरात शेती आणि घरांचे जे नुकसान होईल त्याबाबत पंचनामा करून त्यांना मदतीसाठीचा अहवाल सादर करावा. तसेच या कामासाठी संयुक्त पथकाची नेमणूक करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिका-यांनी काढले आहे. याबाबत संबंधीत अधिकारी आणि कर्मचा-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.