वणीत विदर्भवाद्यांतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वणीत आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज गुरुवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात दुपारी हे आंदोलन झाले. राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा विदर्भात असताना तसेच अद्यापही स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती न करण्यात आल्याने हे आंदोलन करण्यात आले.

28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार झाला. या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने विदर्भाच्या जनतेची इच्छा नसताना महाराष्ट्रात सामील करून घेतले. नागपूर करारात दिलेल्या 11 कलमांपैकी बहुतांश कलमा पाळल्या गेल्या नाही म्हणून नागपूर करार हा संपुष्टात आला असून विदर्भातील जनतेचा बॅकलॉग वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून 47 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली.

बेरोजगारांची फौज वाढली, नक्सलवाद वाढला, कुपोषण वाढले आहे यापासून मुक्ती करता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन कर्त्यांनी नागपूर कराराच्या प्रतीची होळी केली.

यावेळी प्रा.पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, प्रा.बाळासाहेब राजुरकर, नामदेवराव जेनेकर, संजय चिंचोलकर, संजय खाडे, राजू पिंपळकर, प्रविण खानझोडे, ऍड.रुपेश ठाकरे, अमित उपाध्ये, प्रमोद खुरसने, धीरज भोयर, अलका मोवाडे, निलिमा काळे, अनिल गोवारदिपे, राकेश वराटे, देवराव पा.धांडे, दशरथ पाटील, होमदेव कनाके, देवा बोबडे, रामदास पा.पखाले, प्रभाकर उईके, मारोती मोवाडे, भाऊराव लखमापूरे, विठ्ठल हेकाडे, व्हि.बि.टोंगे यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

पदयात्रा आणि महिला मेळाव्याचे आयोजन
स्वातंत्र्याच्या लढाईचे प्रतीक असलेले आष्टी (शहीद) जिल्हा वर्धा येथून विदर्भ संकल्प पदयात्रा 30/09/2023 पासून काढून ती तळेगाव- आर्वी- कौंडण्यपूर अशी जाणार आहे. तर दिनांक 02/10/ 2023 ला दुपारी 1 वाजता विदर्भ संकल्प महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भवादी कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: 

दुचाकी चोरट्यांचा शहरात हैदोस, बस स्टँड आणि मार्केटमधून दुचाकी लंपास

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.