नवरात्रोत्सव निमित्त जैताई मंदिर कर्मचाऱ्यांचा सन्मान
बेबीताई चौधरकर व गिरिजाबाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाउन नियमांमुळे या वर्षी वणीकरांचे आराध्य दैवत जैताई मंदिरात नवरात्री दरम्यान कोणतेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. मात्र कोरोना काळातही अबोलपणे आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडणार्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार घेण्याचा कार्यक्रम जैताई देवस्थान समितीने हाती घेतला आहे.
छोटेखानी व कौटुंबिक स्वरूपात आयोजित या कार्यक्रमात बुधवारला जैताई नवरात्र अन्नपूर्णा विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या बेबीताई चौधरकर हिचा पती सुनीलसह शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जैताई अन्नछत्र विभागात समर्पित भावनेने सेवा देणाऱ्या गिरिजाबाई यांचा सुद्दा या वेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आशुतोष शेवाळकर, बाळासाहेब नगरवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात जैताई देवस्थान समितीचे माधव सरपटवार, दिवाण फेरवानी, राजा जयस्वाल, किशोर साठे, मयूर गोयनका व नामदेव पारखी इत्यादी हजर होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)