जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सतत घरफोडीचे सत्र सुरु असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी गणेशपूर रोडवरील मारोती टाऊनशिपमधील एक घर फोडून घरातून तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट प्रकल्पात अधिकारी असलेले विजय चौहान यांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी तक्रार नोंदविली.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार आरसीसीपीएल सिमेंट कम्पनीत अधिकारी आहे. ते शहरालगत मारोती टाऊनशीप मध्ये भाड्याने राहतात. मागील 5 दिवसांपासून ते कामानिमित्त बाहेरगावी जाऊन होते. दरम्यान बुधवारी घरशेजाऱ्यांनी फोन करून त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कडीकुंडा तुटून असल्याची माहिती दिली.
माहितीवरून विजय चौहान लगेच वणी येथे पोहचून बघितले असता चोरट्यानी घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करून ठेवले. तसेच कपाटामधून चांदीचे दागिने व भांडे, रोख रक्कम असा अंदाजे 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे चोरट्यांनी लॅपटॉप चोरलेला नाही. चोरट्यांनी ट्रेसिंग होऊ नये यासाठी काळजी घेतली की गरज नसल्याने चोरला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चोरटे जागे, पोलीस विभाग निद्रावस्थेत…!
गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून शहरात सातत्याने घरफोडी सुरू आहे. त्यातच भोंगळे ले आऊटमध्ये दिवसा धवळ्या घरफोडी झाली. शहरात घरफोडीचे सत्र सुरू असताना दुसरीकडे अद्याप एकही चोरीच्या प्रकरणाचा उकल पोलिसांना करता आला नाही. घर बंद असले की फुटले अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. यामुळे वणीकर दहशतीत, चोरटे जागे आणि पोलीस विभाग निद्रावस्थेत असे काहीशी परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे. शहरात काही दिवसांआधी काही भिकारी दाखल झाले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.