मारेगाव तालुक्यात कु. कांचन आवारी प्रथम तर कु. सोनल ठाकरे द्वितीय

तालुक्याचा निकाल 92.41 टक्के, कोणत्या ज्यु. कॉलेजमधून कोण टॉप ?

भास्कर राऊत, मारेगाव: 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. तालुक्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला आहे. संकेत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु कांचन संतोष आवारी ही ९० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. तर याच कॉलेजची सोनल हरिश्चंद्र ठाकरे ही 88.83% घेऊन द्वितीय आली.

या वर्षी कला, विज्ञान, वाणिज्य विभागातून तालुक्यातून एकूण ९४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्या पैकी ८७७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ९२.४१ टक्के आहे. ज्या शाळांची परीक्षा त्याच शाळेत झाल्याने निकालाची टक्केवारी वाढेल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात मात्र ज्युनिअर कॉलेजच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असली तरी विद्यार्थ्याच्या गुणांच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय जुनिअर कॉलेज हिवरा या कॉलेजचा निकाल 100% लागला असून कु. प्रतीक्षा नरेंद्र लांडगे ही 80.67% गुण घेत कॉलेजमधून प्रथम आलेली आहे. आदर्श कॉलेज मार्डी या कॉलेजचा निकाल 97.43% लागला असून येथील कु. साक्षी शेषराव सातपुते ही 82% गुण मिळवीत कॉलेजमधून प्रथम आली.

बालाजीपंत चोपने कॉलेज बोटोनीचा निकाल 98.21% लागला असून येथील कु. वैष्णवी पंढरीनाथ रोहनकर ही 67.83% गुण मिळवीत कॉलेजमधून प्रथम आलेली आहे. भारत विद्या मंदिर कुंभा या कॉलेजचा निकाल 100 % असून येथील शुभम वासुदेव मोहुर्ले हा 72.33% गुण मिळवीत कॉलेजमधून प्रथम आलेला आहे.

कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल 66.11% लागला असून येथील साहिल विजय पाझारे 80.16% गुण मिळवून कॉलेजमधून प्रथम आलेला आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.77% लागला असून सागर मारोती खोंडे हा 72.66% गुण घेऊन कॉलेजमधून प्रथम आलेला आहे. विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% लागला असून कला शाखेतून साक्षी विजय गोवारकर ही 71.17% तर वाणिज्य शाखेतून नमिता अमर गजबे 87% गुण घेत प्रथम आलेल्या आहे.

विद्यानिकेतन जुनिअर कॉलेजचा निकाल 100% लागला असून कु. खुशबू पांडे ही 87.67 % गुण मिळवीत कॉलेज मधून प्रथम आलेली आहे. जीवन विकास जुनिअर कॉलेज हटवांजरी या कॉलेजचा निकाल 97.14% लागला असून कु. सुचिता फुलोजी कुमरे ही 74.84 % गुण घेत प्रथम आलेली आहे. संकेत कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% लागला असून येथील कु. पूजा अनिल सोयाम ही 79.50 % गुण घेत कॉलेजमधून प्रथम आलेली आहे.

राष्ट्रीय विज्ञान जुनिअर कॉलेज मारेगाव या कॉलेजचा निकाल 98.85% लागला असून कु. सोनू आनंद तेलंग ही 86% गुण मिळवीत कॉलेजमधून प्रथम आलेली आहे. बोटोनी आश्रम शाळा येथील कला शाखेचा निकाल 92% लागलेला असून विज्ञान शाखेचा निकाल 100% लागलेला आहे. कला शाखेतून कु. खुशिया मरस्कोल्हे ही 67.33% गुण घेत शाखेतून प्रथम आलेली आहे. तर विज्ञान शाखेतून कु. कोमल गोवर्धन ही 79.83% गुण घेत कॉलेजमधून प्रथम आलेली आहे. नेताजी कॉलेज म्हैसदोडका या कॉलेजचा निकाल 97.56% लागलेला असून स्वप्नील ठावरी हा 70% गुण घेऊन कॉलेजमधून प्रथम आलेला आहे.

९०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम आलेली संकेत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु कांचन संतोष आवारी व याच कॉलेजची सोनल हरिश्चंद्र ठाकरे ही 88.83 % गुण घेऊन द्वितीय आली. कांचन व सोनल आपल्या यशाचे श्रेय पांडे सर, मुजफ्फर सर, आणि आईवडिलांना देते. तिच्या यशामुळे या दोघींचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.