‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ आंदोलन करणार तीव्र

11 वी विज्ञान प्रवेशाचा तिढा कायम

0

विवेक तोटेवार, वणी: 11 वी विज्ञान प्रवेशासंबंधी स्वप्निल धुर्वे यांनी 14 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यानं उपोषण आणखी तीव्र करणार असल्यानं त्यांनी जाहीर केलं आहे.

गेल्या वर्षी प्रवेशासाठी उपोषण करून ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या प्रयत्नांना यश आले व विद्यार्थ्यांना 11वीच्या अनुदानित वर्गामध्ये प्रवेश मिळाला. गेल्या वर्षीसारखी परिस्थिती याही वर्षी आली असून यावर्षी कोणाताही तोडगा काढण्यात आला नसल्यानं आंदोलन करावं लागत आहे ही एक शोकांतिका आहे.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल विध्याथ्याना अनुदानित तुकडी मध्ये प्रवेश देण्यात यावा याकरिता 14 ऑगस्ट ला उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे. जर मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्निल धुर्वे यांनी दिला आहे.

(हे पण वाचा: रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचं उपोषण)

लोकमान्य टिळक महाविद्यालयात अजूनही अनुदानित पटसंख्या शिल्लक असतानाही प्रवेश नाकारून विनाअनुदानित तुकडीत प्रवेश दिला जात आहे. याकरिता 14000 रुपयांपर्यंत ची प्रवेश फी आकारण्यात येत आहे. असा आरोप करून त्यामुळे गरिबांनी शिकावं कसं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. सोबतच शिक्षण विभाग यवतमाळ यांना देण्यासाठी संघटने मार्फत पाच कार्यकर्ते गेले असल्याची माहितीही त्यांनी त्यांनी दिली.

मागील वर्षी जर 50 विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीत प्रवेश दिला जाऊ शकतो तर यावेळी 35 विद्यार्थ्यांना प्रवेश का दिला जाऊ शकत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.