सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री सुरू झाली आहे. गावातील बसस्टँड परिसर, तलाव परिसर यासह पानटपरी, चिकनच्या दुकानातूनही अवैधरित्या दारुची विक्री होत आहे. सदर दारू विक्रेते मुकूटबन येथील देशी दारू दुकानातून एक पेटी, अर्धी पेटी तर कुणी 15 ते 20 पव्वे घेऊन त्याची दुप्पट म्हणजेच 100 रुपये प्रमाणे विक्री करीत आहे. तर काही लोकांना दोन तीन पेट्या दररोज दारूचा पुरवठा दुकानदाराकडून केला जात आहे. याशिवाय खातेरा येथून पैनगंगा नदीतून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात 4 ते 5 पेटी देशी दारूची दररोज तस्करी केली जाते.
या दारू तस्करीकडे अडेगाव येथील बिट जमादाराचा कानाडोळा होताना दिसत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्याचे चांगलेच फावत आहे. त्यात ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ हे धोरण अवलंबल्याने दोघांचाही चांगलाच फायदा होत आहे. मात्र यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे.
काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तर कहरच केला असून कोंबड बाजारावर धाड टाकण्याचा सपाटा लावला आहे. काही दिवसांआधी कोंबड बाजारातील कोंबड्या गायब झाल्याचे प्रकरण अद्यापही लोक विसरले नसताना सातत्याने अशा घटना घडत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर वचक कोण बसवणार? असा सवाल गावक-यांकडून विचारला जात आहे.
विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील संपूर्ण ठाण्यांतर्गत कोणत्याही गावात अवैध धंदे सुरू ठेऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे. मात्र काही कर्मचारी त्याला छेद देऊन पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करताना दिसत आहे. या प्रकाराकडे उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.
हे पण वाचा…
मोबाईल खरेदीवर पहिल्यांदाच मोठी सूट, न्यू अंकुश मोबाईलमध्ये दिवाळी ऑफर
हे पण वाचा…