JCI चा पदग्रहण सोहळा संपन्न, नवीन पोपळी यांची अध्यक्षपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जेसीआय संस्थेच्या वणी शाखेचा 10 वा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यात अध्यक्षपदी नवीन पोपली सचिव म्हणून गौरव खुंगर सचिव आणि तर यश श्रीवास्तव यांनी कोषाध्यक्ष म्हणून आपला पदभार स्वीकारला. तर जयंत पांडे, रोनीत गुंडावर, अमोल गायकवाड, सुमित कुरेवार आणि अभिषेक चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नाशिक झोनचे अध्यक्ष जितेंद्र बोरा यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर अनुप गांधी यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती होती. तर सौरभ बरडिया यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेसीआयचे मावळते अध्यक्ष रवि हनुमंते यांनी केले. यावेळी त्यांनी वर्षभरात झालेले कार्यक्रम आणि उपक्रमांचा आढावा घेतला तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेसीआयने 18 नवीन सदस्य संस्थेत जोडले. नवनिर्वाचित अध्यक्षांनी तरुणांमधले नेतृत्व गुण पुढे येण्यास अधिकाधिक प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.

नरेंद्र बरडिया यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले. यावेळी नवीन सदस्यांमध्ये संजीव कुमार गुप्ता, शाश्वत बिलोरिया, भूषण कोंडावार, अंकित चिंडालिया, कार्तिक देवळे, मयुर मेहता, आशिष घाटोळे, महेश पटेल, डॉ. याशिका पोपली, रिया खुंगर, तनुश्री पांडे, हिरल पटेल, मीनल कुरेवार, नेहा देवळे, विजयालक्ष्मी गुप्ता, प्रशंसा श्रीवास्तव, पूजा काळे, स्नेहा तुगनायत यांनी आपली सदस्यता ग्रहण केली.

Comments are closed.