वणीत धुळवडीला येणार सुप्रसिद्ध हास्य कवी एहसान कुरेशी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत धुळवडीनिमित्त (रंगपंचमी) हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक 7 फेब्रवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे. यात देशातील सुप्रसिद्ध हास्य कवी एहसान कुरैशी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह मुंबई येथील जीवन परवीन, रोहित शर्मा व किरण जोशी हे सुप्रसिद्ध कवि देखील उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय अती दीड शहाणे समितीद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अती दीड शहाणे समितीद्वारा दर वर्षी धुळवडीनिमित्त (रंगपंचमी) हास्य कवि संमेलनाचे आयोजन होत आहे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून हे संम्मेलन होवू शकले नाही. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम होत असल्याने वणीकरांनी यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे राजू उंबरकर, अशोक चिंडालीया, दिपक कोकास, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, रवि बेलुरकर, राजाभाऊ बिलोरीया, सुनील जिवने, सुभाष तिवारी, शेखर शिरभाते, निकेत गुप्ता, दिपक छाजेड, डॉ. महेंद्र लोडा, बंटी खुराणा, नितीन शिरभाते, तुषार अतकारे, भिकमचंद गोयनका, रमेश तांबे, रवि सालपेकर इत्यादी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.