नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका स्थळ असलेल्या मारेगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार दीपक पुंडे यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. डॉ. नेमनवार यांनी लस घेऊन या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला.
तालुक्यातील नागरिकांना कोरोना या रोगापासून बचाव व्हावा यासाठी शासनाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्याच अनुसंगाने मारेगाव येथील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेत सुरुवातीला आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पोलीस विभाग इत्यादींना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर वयोवृद्ध व ज्यांना दुर्दैर आजार आहे अश्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
साठ वर्षांवरील नागरिकांनी ग्रामीण रुग्णलाय मारेगाव येथे ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मोबाईल वरून कोविन ऍप किंवा https://www.cowin.gov.in/ या वेबसाईटवरूनही नोंदणी करता येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीस अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या प्रसंगी अमित ठमके अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी प्रिया वानखडे, डॉ. विपुल नेमनवार, अधिपरिचारिका कोवे, नक्षणे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: