संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी फुटला बेंबळाचा बंधारा

शेतातील पिके नेली खरडून, आर्थिक मदतीची शेतक-यांची मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: संततधार पावसामुळे मारेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडले. यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. बेंबळा प्रशासनाच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याने बेंबळा प्रकल्पाच्या कामाविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.

मार्डी पासून जवळच असलेल्या देवाळा तसेच चोपण या गावाजवळील बेंबळा प्रकल्पाचा कालवा सततच्या पावसाने वाहून नेला आहे. त्यामुळे या कालव्यातून आलेल्या पुराचे पाण्याने देवाळा गावाच्या सभोवताल वेढा दिला होता. यामध्ये आजूबाजूच्या शेतात पाणीच पाणी होऊन उभी पिके खरडून नेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने बेंबळच्या सदोष कामाचा फटका मार्डी व परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. बेंबळाची दोषयुक्त कामाने देवाळा येथील मुख्य कालवाच फुटल्याने हे बेंबळा कालव्याचे पाणी संजय बोधाने यांच्या शेतातून गावाकडच्या दिशेने जाऊन पाहता पाहता देवाळा गावा सभोवताल पाण्याने वेढा दिला.

या कालव्या लगत असलेले शेती पाण्याखाली आली. यामध्ये संजय बोधाने, सुभाष निमकर, रमेश मते, मनोहर कोठारी, विशाल लांडे यांच्या शेतातील उभे पीक खरडून नेली. यामुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे गावालगत असलेल्या कुकुटपालन शेड मधील पंचवीस कोंबड्या वाहून गेल्या गावासभोवताल पाण्याचा वेढा पाहून गावाकऱ्याची तारांबळ उडाली.

अशीच अवस्था चोपण या गावाची झाली. येथीलही मुख्य कालवाच फुटल्याने देवाळकर यांच्या शेतातील मातीच खडडून नेली. तसेच सभोवतालच्या वसंत ताजने, सतीश ताजने, जगन ताजने, लीलाधर वागदरकर, खीरटकर यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. कालवा वाहून गेल्याने बेंबळा कालव्याचे चुकीच्या बांधकामाने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मारेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी गावास भेट दिली. सुदैवाने नाल्याच्या पलीकडून बेंबळा कालवा फुटला अन्यथा नाल्याच्या गावाकडच्या दिशेने हा कालवा फुटला असता तर मोठा अनर्थ घडला असता. शिवणी येथीलही शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी चुकीच्या पद्धतीने काढल्याने येथीलही अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी सरपंच अशोक धोबे यांनी केलेली आहे.

हे देखील वाचा:

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

Comments are closed.