मारेगाव येथून होणारी ट्रॅव्हल्सची अवैध प्रवासी वाहतूक थांबवा

ऑटो चालक संतप्त, प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून वणी-यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्या पूर्णपणे बेकायदेशीर असूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. आरोप करत याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जर वाहतूक विभाग व पोलिसांनी कारवाई न केल्यास मारेगाव पोलीस ठाण्यासमोर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही ऑटो चालकाने दिला आहे.  

तक्रारीनुसार, खासगी वाहनांना केवळ धार्मिक स्थळे, धार्मिक उत्सव, सहल इ. स्टेज कॅरेज परमिटमध्ये प्रवाशांची वाहतूक करता येते. यात बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांची यादी असणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून वणी-यवतमाळ या मार्गावर डझनभर ट्रॅव्हल्स सुरू आहे. संबंधित विभागाने अधिक लक्ष देण्याऐवजी ट्रॅव्हल्सवर मेहरबानी केल्याची तक्रार ऑटोचालक नवाझ शरीफ यांनी केली आहे.

आरटीओ वाहतूक शाखा, उपवाहतूक शाखा वणी पोलीस, मारेगाव पोलीस यांच्यासमोर या खासगी बसेस चालवल्या जातात, या ट्रॅव्हल्स चालकांवर कधीच कारवाई होत नाही, मात्र गरीब ऑटो चालकांना वारंवार अपमानीत करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. असेही तक्रारीत म्हटले आहे. जर ट्रॅव्हल्सची अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली नाही तर मारेगाव पोलीस ठाण्याजवळ मोठे आंदोलन केले जाईल इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

Comments are closed.