झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ठ करा

खा. बाळू धानोरकर व माजी आ. वामनराव कासावार यांचे प्रयत्न

0

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रतील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी जामणीला पाच वर्षांपूर्वी नगरपंचायातीचा दर्जा मिळाला आहे. परंतु झरीला लागूनच असलेल्या जामनी गावाला नगरपंचायत मध्ये समाविष्ट न केल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ठ करा या मागणीसाठी खा. बाळू धानोरकर व माजी आ. वामनराव कासावार यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

जामनी गाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावर याकरिता खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनी वरिष्ठ पर्यंत सतत पाठपुरावा करीत आहे. नगरपंचायात ला जामणी प्रभाग जोडन्या करिता माजी आमदार वामनराव कासावार यांनी वने भूकंप पुनर्वसन मंत्री , महाराष्ट्र राज्य याना निवेदन दिले. तसेच बाळू धानोरकर यांनी थेट केंद्रीय मंत्रलयात पाठपुरावा केला.

जामनी गाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावर याकरिता खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांनी वरिष्ठ पर्यंत सतत पाठपुरावा करीत आहे. नगरपंचायात ला जामणी प्रभाग जोडन्या करिता माजी आमदार वामनराव कासावार यांनी वने भूकंप पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य याना निवेदन दिले. तसेच बाळू धानोरकर यांनी थेट केंद्रीय मंत्रलयात पाठपुरावा केला आहे.

वामनराव कासावार यांच्यानुसार त्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ट करण्यारिता आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री महोदयांनी निर्देश दिले आहे व त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला सुद्धा पाठवण्यात आली आहे. पाच वर्षपूर्वी जामणी, शिरोला व झरी असे तीन प्रभाग मिळून नगरपंचायत अस्थितवात येणार होती पण ते झाले नाही.

जामनीचा लवकरच नगरपंचायतीमध्ये समावेश – वामनराव कासावार
मी दिलेल्या तक्रारीवरून मंत्री महोदयायांनी लक्ष देऊन समाविष्ठ करण्याबाबत निर्देश दिले आहे अशी प्रतिक्रिया वामनराव कासावार यांनी दिली आहे.  त्यामुळे जामणी ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये समावेश होण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.
– वामनराव कासावार, माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र

जामनी गाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ट असते तर गावात मोठे विकास कामे झाली असते. कमी लोकवस्ती असलेला व नगरपंचायतला लागून असलेल्या गावाला समाविष्ट करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. झरी व शिरोला गाव मिळून १७ वॉर्ड आहे. झरी व शिरोला गावातील बहुतांश वॉर्डातील सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे परंतु जामनीत जाणाऱ्या व अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अशी तक्रार स्थानिक रहिवाशांची आहे.

झरी, शिरोला व जामनी हे एकदम कमी लोकसंख्येचे गाव आहे. झरी नगरपंचायत आदिवासी बहुल तालुक्यातील असल्याने शासनाचा निधी विकास कामाकरिता मोठ्या प्रमाणात येतो ज्यामुळे विकासकामे सुद्धा मोठ्या प्रमाणात करता येते. जामनी गाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट नसल्याने मोठ्या प्रमाणात होणारे विकासकामे संथ गतीने होत आहे. आता जामनी ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये समाविष्ट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.