झरी तालुक्यातील शासकीय व विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

मान्यवरांच्या हस्ते झाले अनेक ठिकाणी ध्वजारोहण

0

सुशील ओझा, झरी: देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष पूर्ण झाले आहे. देश स्वातंत्र्य झाल्याची खुशी संपूर्ण देशात धजारोहण करून म्हणजेच तिरंगा फडकून साजरी केली जाते. याच अनुषंगाने झरी पंचायत समिती कार्यालयात सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते धजारोहण झाले. त्यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, विस्तार अधिकारी इसळकर व कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयात तहसिलदार रामचंद्र खिरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाटण पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे व पोलीस कर्मचवरी उपस्थित होते. मुकुटबन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव कैलास जाधव आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य व ग्रामवासी उपस्थित होते.

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धर्मा सोनुने यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी उपनिरीक्षक युवराज राठोड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ग्रामीण रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळेस डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स व कर्मचारी उपस्थित होते.

पुनकाबाई आश्रमशाळेत मानद सदस्य गणेश उदकवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी संकेत उदकवार, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. गणेशपूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा रत्नमाला बरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यावेळी उपसरपंच कुसुम मेश्राम, सचिव, सदस्य व ग्रामवासी उपस्थित होते. अडेगाव येथे सरपंच अरुण हिवरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच, सचिव प्रांजली वाढई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामवासी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.