26 जानेवारीला वणीत रंगणार आंतर शालेय नृत्य स्पर्धा

प्रेस वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 26 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता आंतर शालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ (एसपीएम) विद्यालयाच्या रंगमंचावर ही नृत्य स्पर्धा होणार आहे. वर्ग 5 ते 7 व वर्ग 8 ते 10 अश्या दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन नृत्याला चषक देण्यात येणार आहे. यासह प्रोत्साहनपर व नृत्याच्या प्रभारी शिक्षकाला देखील बक्षिसे देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट नृत्याला फिरता बाळशास्त्री जांभेकर चषक प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शाळांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन प्रेस वेल्फेअरचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.