बेलदार समाजा तर्फे ‘कांदेपोहे’ स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

मेळाव्यात 150 इच्छुकांनी दिला परिचय

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात बेलदार समाजाचा प्रथम राज्यस्तरीय ‘कांदेपोहे स्नेहमिलन सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार 20 फेब्रुवारीला सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज, वरोरा रोड, वणी येथे हा कार्यक्रम पार पडला. या वधुवर परिचय मेळाव्यात 154 विवाहोत्सुकांनी परिचय दिला. बेलदार समाज उपवधू-वर सूचक, महाराष्ट्र तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कांदेपोहे स्नेहसंमेलन सोहळा दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उदघाटन व परिचय पुस्तिका प्रकाशन करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात उपवधूवर परिचय व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका राजमनी सेपूरवार, रा. राजुरा, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदिप बोनगीरवार होते. ऍड. किष्टन्ना मुत्यलवार, अशोक आकुलवार, मुकुंद अडेवार, अशोक मैदमवार, अर्चना कोट्टेवार, जांबुवंत कुरमेलवार आणि वृंदा मुक्तेवार हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा एडलावार यांनी तर प्रस्तावना गजानन चंदावार यांनी केले. तर पहिल्या सत्राचे आभार दिपक आईंदलवार व दुसऱ्या सत्राचे आभार राकेश बरशेट्टीवार यांनी केले. या स्नेहमिलन सोहळ्यात नोंदणी करून उपवधू-वरांचा परिचय देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा गुंडलवार यांनी केले त्यांना विनोद एडलावार, स्नेहल गोर्लावार, अक्षय तोटावार आदींनी सहकार्य केले.

कांदेपोहे उपवधू-वर पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या परिचय मेळाव्यात 154 उपवधू-वरांनी परिचय दिला. पहिल्यांदाच उपवरवधू यांना केंद्रस्थानी घेऊन अनोखा कांदेपोहे कार्यक्रम घेण्यात आला. याविषयी समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि स्नेहमिलन सोहळ्याची शोभा वाढवली.

प्रदीप बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनात व आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांच्या नियोजनात हा सोहळा पार पाडला, बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणी, युवा बेलदार समाज शहर कार्यकारिणी वणी, बेलदार समाज महिला शहर कार्यकारिणी वणी तथा बेलदार समाज वणी आयोजन समितीने विशेष सहकार्य केले. आयोजक बेलदार समाज उपवधू-वर सूचक, महाराष्ट्रचे समूह प्रशासक गजानन चंदावार, दिपक आईंदलवार, राकेश बरशेट्टीवार, स्नेहल गोर्लावार आदी होते. आयोजन समितीने उपस्थित झालेल्या संपूर्ण समाजबांधवांचे आभार मानले.

हे देखील वााचा: 

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष

Comments are closed.