शिवजन्मोत्सवात चित्तथरार साहसिक खेळाने वेधले वणीकरांचे लक्ष

कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे हिने सादर केले लाठीकाठीचे प्रात्यक्षिक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवरायांची जयंती वणीत जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिवतीर्थावर कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे हिने केलेल्या लाठीकाठी या साहसिक खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिने लाठीकाठीतील भन्नाटी, डबल भन्नाटी (दोन काठी) बेला (गोल फिरणे) इत्यादी प्रकार करून दाखवले. या चित्तथरार प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. खेळाआधी तेजस्वीनीने शिव गर्जना देत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देखील दिली.

तेजस्वीनी ही 14 वर्षांची असून ती एसपीएम शाळेत 8 व्या वर्गात शिकते. तिला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड होती. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या राजताज हिरा आखाडा येथे घेतले.

आज तेजस्वीनी तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक इत्यादी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू गव्हाणे यांची तेजस्वीनी कन्या आहे. त्यांनी दिलेल्या प्रोत्सहानमुळेच साहसिक खेळ इत्यादीमध्ये रुची निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तेजस्वीनीने दिली.

लिंकवर क्लिक करून पाहा प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ… 

हे देखील वाचा:

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा

Comments are closed.